चंद्रपूर – (Jorgewar Puttaparthi Visit) आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पवित्र पुट्टपर्थी येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री सत्यसाई परिवाराचे सदस्य तथा श्री सत्यसाई सेवा संस्थेचे प्रमुख रत्नाकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या वतीने यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या “अम्मा का टिफिन” या समाजोपयोगी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. या आगळ्यावेगळ्या आणि गरजू नागरिकांना मोफत अन्न पुरवणाऱ्या उपक्रमाचे पुट्टपर्थी येथे मोठे कौतुक करण्यात आले आहे. (राममंदिर देणगी चोरी, कांग्रेसचे आंदोलन)
Jorgewar Puttaparthi Visit: चंद्रपूरच्या आमदारांची पुट्टपर्थी येथे सदिच्छा भेट
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पवित्र पुट्टपर्थी येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री सत्यसाई परिवाराचे सदस्य तथा श्री सत्यसाई सेवा संस्थेचे प्रमुख रत्नाकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या वतीने यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या “अम्मा का टिफिन” या समाजोपयोगी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
निराधार, गरजू, रुग्णांचे नातेवाईक तसेच उपाशीपोटी राहणाऱ्या नागरिकांपर्यंत सन्मानाने व प्रेमाने मोफत अन्न पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “अम्मा का टिफिन” उपक्रमाची संकल्पना रत्नाकर यांना अत्यंत भावली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जगभरातील सुमारे १६० देशांमध्ये विविध सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या श्री सत्यसाई सेवा संस्थेच्या कार्यामध्ये “अम्मा का टिफिन” या संकल्पनेचा समावेश करण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
अन्नदान, वस्त्रदान, आरोग्यसेवा, औषधोपचार आणि विविध मानवतावादी उपक्रम राबविणाऱ्या श्री सत्यसाई सेवा संस्थेकडून “अम्मा का टिफिन” उपक्रमाला मिळालेला आशीर्वाद हा या सामाजिक उपक्रमासाठी मोठा सन्मान असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या सहकार्यामुळे अधिकाधिक गरजूंना प्रेम, सेवा आणि माणुसकीच्या भावनेतून अन्न उपलब्ध करून देण्याच्या कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “सेवा हीच खरी साधना” या विचारातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ झाल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






