चंद्रपूर : संविधान दिन चंद्रपूर येथे चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (जीवाला धोका, पोलीस तक्रार घेत नाही, सिंग कुटुंबाची पत्रकार परिषद)
संविधान दिन चंद्रपूर येथे आंबेडकर पुतळ्याला अभिवादन
या अभिवादन सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. चंदाताई वैरागडे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष रामूभाऊ तिवारी, महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेश अडूर, माजी नगरसेवक बापूभाई अन्सारी, अनुताई दहेगावकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, नगरसेविका वनश्री मेश्राम आणि अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष सुनीता गोवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच मीनाक्षी गुजरकर, मुन्नीबाजी, रेखा बारसागडे, आरती खनके, वर्षा बोथले, सुषमा उमरे, आम्रपाली खोब्रागडे, प्रियंका मोडक, पायल गड्डमवार, तेजस्विनी पोडे, राजेश वर्मा, दिलीप चंदेल, मोनू रामटेके, काशीनाथ बोरकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संविधान दिनाच्या या कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






