चंद्रपूर : चिचपल्ली अपघात गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सायंकाळी चंद्रपूर-मूल मार्गावर घडला. चिचपल्ली गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आल्याने तिरुपती कोंटूबे (वय ३३, रा. जिवती) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत नीतेश गिरे (वय २०) गंभीर जखमी झाला. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (भरधाव ट्र्क पानठेल्यावर पलटी, वाचा बातमी)
चिचपल्ली अपघात; ट्रकखाली दुचाकी आल्याने युवकाचा मृत्यू
चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली परिसरात गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. चिचपल्ली गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील जंगल परिसरात सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात जिवती येथील रहिवासी तिरुपती कोंटूबे (वय ३३) या युवकाचा मृत्यू झाला असून, नीतेश गिरे (वय २०) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुपती कोंटूबे आणि नीतेश गिरे हे दोघे दुचाकीवरून मूलकडून चंद्रपूरच्या दिशेने येत होते. याच दरम्यान चंद्रपूरहून मूलकडे जाणाऱ्या ‘एमएच ३४ बीजे ८०८६’ क्रमांकाच्या ट्रकच्या चाकाखाली त्यांची दुचाकी अचानक आली. हा अपघात इतका भीषण होता की तिरुपती कोंटूबे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नीतेश गिरे गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या नीतेश गिरे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. अपघातानंतर ट्रकचालक वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेला रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एकुरके यांनी दुजोरा दिला असून, पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






