चंद्रपुरात पुन्हा पूर?

News34

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, मोठ्या विश्रांतीनंतर 18 ऑगस्ट ला रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, शास्त्रीनगर भागातील नाल्याच्या पाण्याला मार्ग न मिळाल्याने प्रभागातील काही घरात नाल्याचे पाणी शिरल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.

शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मधील कारमेल अकॅडमी च्या मागील भागात अनेक वर्षांपासून नाला वाहतो, मात्र त्या भागात अनेक ले-आऊट चे पडल्याने अनेक वर्षे जुन्या नाल्याच्या पाण्याला जायला मार्ग नाही. चंद्रपुरात मुलांची शाळेतून चोरी?

काही निवासी अपार्टमेंट मधील बिल्डरांनी भिंत बांधून नाल्याचा मार्ग अडविल्याने पाणी जायला मार्ग नसल्याने आज सकाळपासून नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. चंद्रपूर शहरात संतापजनक प्रकार

अचानक वाढलेले पाणी बघता नागरिक चांगले घाबरले आहे, सध्या तरी हे पाणी 5 ते 10 घरात शिरले असून पाऊस सतत सुरू राहीला तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश पचारे यांना माहिती मिळताच तात्काळ ते नागरिकांच्या मदतीला धावले व लगेच मनपाच्या कर्मचाऱ्यांना बोलावीत उदभवलेल्या समस्येबाबत माहिती दिली.

नाल्याचा मार्ग बंद झाल्याने त्यावर उपाययोजना करा असे म्हणत पचारे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

ले-आऊट धारकांच्या चुकीच्या बांधकामामुळे त्या ठिकाणी आज सदर परिस्थिती निर्माण झाली आहे, एकंदरीत मनपा अधिकाऱ्यांनी सुद्धा यावर लक्ष दिले नाही, चुकीच्या बांधकामावर मनपाने आधीच नियंत्रण आणायला हवे होते मात्र तसे न झाल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!