Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

Badlapur sexual assault case राज्यातील बदलापूर येथे प्राथमिक शाळेतील 4 वर्षीय 2 मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला.

अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेचा संदेश देणारी निघणार रॅली

त्यांनतर पालकांचा रोष उफाळून आला, 10 तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले, पीडित मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी 12 तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. 10 तास रेल्वे रोको आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, आतापर्यंत या घटनेनंतर 38 आंदोलकांना अटक केली असून 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Badlapur sexual assault case या घटनेचे पडसाद चंद्रपुरात पडले असून शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस गटाने राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले.

यावेळी बेबीताई उईके यांनी बदलापूर प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले, आम्हाला लाडकी बहीण योजना नको आधी लाडक्या बहिणीला सुरक्षित करा, या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

राज्यात सध्या महिला अत्याचार घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सरकार अश्या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अपयशी ठरली आहे, सध्या राज्यात सरकार द्वारे लाडक्या बहीण योजनेचे इव्हेंट सुरू करण्यात आले मात्र अद्यापही लाडक्या बहिणीला सुरक्षित कसे ठेवणार यावर ठोस पावले उचलण्यात आली नाही.

चंद्रपुरात जागृती मशाल मंच द्वारे 31 ऑगस्टला मध्यरात्री महिला सुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढण्यात येणार आहे, जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित रहाव्या व प्रत्येक महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे अशी शपथ सुद्धा यावेळी घेण्यात येणार आहे.

चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसचे निदर्शने

राष्ट्रवादी कांग्रेसच्या निदर्शने आंदोलनात शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल, महिला अध्यक्ष शिल्पा कांबळे व राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!