Chandrapur Beer Shop बंद करण्याच्या मागणीबाबत निवेदन

बिअर शॉपी बंद करा; आमदाराचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 18, 2026

चंद्रपूर – Chandrapur Beer Shop प्रकरणामुळे चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा वॉर्डात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी अपार्टमेंटमधील दोन बिअर शॉपी कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन निवेदन दिले. वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (बस स्थानकासमोर सुगंधित तंबाखूची विक्री, FDA ची धाड)

आमदार श्री सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर पोलिस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांची भेट घेऊन चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वॉर्ड मधील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये असलेले पि. जे. बिअर शॉपी तसेच P.G. बिअर शॉपी हे दोन्ही दुकाने कायमचे बंद करण्याबाबत चर्चा करून निवेदन दिले. (मैत्रिणीच्या घरी जाते म्हणून घराबाहेर निघाली, १२ वर्षीय अल्पवयीन घरी परतलीच नाही)

Chandrapur Beer Shop वाद नेमका काय आहे?

चंद्रपूर येथील जगन्नाथ बाबा वार्ड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये असलेले P.J. बिअर शॉपी तसेच P.G. बिअर शॉपी हे मागील ३ ते ४ वर्षांपासून सुरू आहे. सदरहू बिअर शॉपीमध्ये देशी तसेच विदेशी दारू भरपूर प्रमाणात विकत असतात. सदरहू शॉपीचे समोर सकाळी ५ वाजेपासून १२ वाजेपर्यंत देशी तसेच विदेशी दारू मिळत असल्यामुळे मद्य शौकिनांच्या रांगा लागलेल्या असतात. रविवार तसेच बंद असलेल्या दिवशी तर फारच गर्दी राहते. दोन्ही बिअर दुकानाचे समोर मद्य शौकीन रोडवर आपली वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असतात.

यामुळे मागील हप्त्यात एका महिलेचा अपघात होऊन ती जखमी झाली. हे दोन्ही दुकान सोसायटीची परवानगी नसतांना सुध्दा जबरदस्तीने सुरू आहे. तसेच दोन्ही दुकानदारांनी बेकायदेशीरपणे दुकानाच्या समोर टिनाचे शेड टाकून अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे सदर दोन्ही बिअर शॉपी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

पोलिस अधीक्षक यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.

सदर दोन्ही बिअर शॉपी दुकाने कायमचे बंद करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांना भेटून बिअर शॉपी बंद करण्याबाबत मागणी करणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक श्री. पप्पू देशमुख, सिनेट सदस्य प्रा. दिलीप चौधरी व मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment