Chandrapur Blood Donation अंतर्गत GMC चंद्रपूर रक्तदान शिबिर

चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करण्याचे आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 12, 2026

चंद्रपूर – Chandrapur Blood Donation अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील GMC (मातोश्री कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय) येथे रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढत्या रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णालय प्रशासनाने हा महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. सर्जरी विभाग, पदव्युत्तर विद्यार्थी संघटना (MARD) आणि सर्जन्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांची मालिका सुरू करण्यात आली आहे. 2025 च्या तुलनेत यावर्षी रक्तसंकलनात मोठी घट झाल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या उपक्रमामुळे रुग्णालयातील रक्तसाठा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Chandrapur Blood Donation अंतर्गत मोठी आरोग्य मोहीम

शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन 2025 मध्ये 15 हजार 258 रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ 5 हजार 102 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रक्तसंकलन वाढविण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. (प्रदूषण विरोधात युवासेना आक्रमक, मोठ्या आंदोलनाची तयारी)

राष्ट्रीय सर्जन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्जन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन सरदेशपांडे, महाराष्ट्र सर्जन असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ. संजय घाटे, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मयुर बंडावर आणि ज्येष्ठ सर्जन डॉ. मंगेश टिपणीस उपस्थित होते.

रक्तदान सप्ताहांतर्गत 12 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, 13 जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थी आणि 15 जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तकेंद्र प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. स्वाती देरकर, डॉ. मिलिंद झाडे, राकेश शेंडे तसेच मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. मयुर सदवाणी व सचिव डॉ. शोएब शेख यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि तरुण रक्तदात्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्वेच्छेने रक्तदान करून शासकीय रक्तकेंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास सहकार्य करावे.  शासकीय रक्तकेंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्याने रक्तदानाद्वारे समाजहितासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment