chandrapur credit society fraud

चंद्रपुरात श्री. साई नागरी पतसंस्थेत २.४९ कोटींचा अपहार; ३० संचालक, ३ व्यवस्थापक आणि पिग्मी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर: (chandrapur credit society fraud) प्रकरणात चंद्रपूरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील श्री. साई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे तब्बल २ कोटी ४९ लाख ८ हजार ९४९ रुपयांचा प्रचंड आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. लेखापरीक्षकांच्या सखोल तपासणीनंतर हा धक्कादायक गैरव्यवहार समोर आला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे ३० संचालक, ३ व्यवस्थापक आणि १ पिग्मी एजंट अशा एकूण ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (२३ लाखांच्या घरफोडीत ७ जण अडकले)

chandrapur credit society fraud : लेखापरीक्षकांच्या ऑडिटमध्ये धक्कादायक खुलासे

चंद्रपूर येथील श्री. साई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेमध्ये गुंतवणूकदारांच्या ठेवींची अफरातफर करून तब्बल २ कोटी ४९ लाख ८ हजार ९४९ रुपयांचा प्रचंड आर्थिक अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लेखापरीक्षकांनी दिलेल्या लेखी अहवालावरून चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे ३० संचालक, ३ व्यवस्थापक आणि १ पिग्मी एजंट अशा एकूण ३४ जणांविरुद्ध फसवणूक आणि आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रचंड गैरव्यवहारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आणि विशेषतः गुंतवणूकदारांमध्ये तीव्र खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास आता चंद्रपूर पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) अत्यंत गांभीर्याने करत आहे.

या मोठ्या आर्थिक घोटाळ्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, चंद्रपूर येथील सहकारी संस्थांचे श्रेणी-२ चे काम-लेखापरीक्षक संदीप जयदेव भानसे (वय ४६ वर्षे) यांनी श्री. साई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (रजि.क्र. ३७६) या संस्थेच्या सन २०२३ ते २०२५ या कालावधीतील आर्थिक पत्रकांची सखोल तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान त्यांनी पतसंस्थेचे रोख पुस्तक, जमा व खर्चाचे व्हाउचर, बँक व गुंतवणूक स्टेटमेंट आणि कर्ज प्रकरणांच्या कागदपत्रांचे बारीक निरीक्षण केले. या लेखापरीक्षणामध्ये पतसंस्थेचे तत्कालीन संचालक, व्यवस्थापक आणि एजंट यांनी संगनमताने आणि पद्धतशीर कट रचून गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेल्या ठेवींमध्ये प्रचंड घोळ केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींनी पतसंस्थेच्या कारभारात अनेक गंभीर व बेकायदेशीर गैरप्रकार केल्याचे ऑडिटमध्ये उघड झाले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांच्या ठेवींमध्ये दोनदा मुदत ठेव परत दाखवणे, प्रत्यक्षात दोन मुदत ठेवी असताना केवळ एकाच ठेव पावतीची नोंद घेणे आणि अखेरची शिल्लक कॅश बुकमध्ये न घेता ती परस्पर गायब करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर, आरोपींनी कॅश बुकमध्ये खोट्या व बनावट नोंदी दर्शवून प्रत्यक्षात नसलेले कर्ज, व्याज व इतर रकमा दाखवल्या, खर्च आणि जमा बाजूच्या व्हाउचरच्या नोंदी बनावट तयार केल्या, तसेच अभिकर्त्यांनी स्वीकारलेल्या ठेवींपैकी काही रक्कम मुख्य खात्यात कमी जमा केली.

याशिवाय, कॅश बुक आणि प्रत्यक्ष बँक खात्यामधील व्यवहारांत मोठी तफावत ठेवत उपविधीमधील कर्ज मंजुरीच्या नियमांचे (कर्ज रेशिओ) थेट उल्लंघन करून बनावट कर्ज वाटप करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या ठेवींची मुदत संपल्यानंतरही त्यांना व्याज, लाभांश, फायदा अथवा मूळ ठेव परत न करता एकूण २ कोटी ४९ लाख ८ हजार ९४९ रुपयांचा हा सामूहिक अपहार करण्यात आला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment