Khalsa Help Foundation च्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी घोषणेदरम्यान पदाधिकाऱ्यांची उपस्थिती दर्शविणारे दृश्य

Khalsa Help Foundation । मानवतेच्या सेवेसाठी खालसा हेल्प फाउंडेशनचे चंद्रपुरात पाऊल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 15, 2026

Khalsa Help Foundation : चंद्रपूर – मानवतेची सेवा करणारी संस्था म्हणून ओळख असलेली खालसा हेल्प फाउंडेशनचा विस्तार सुरु असून चंद्रपुरात या फाउंडेशनची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती मध्ये गरजू नागरिकांना अन्न व औषध सह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी एकमेव संस्थेचे शिलेदार आता चंद्रपुरात जिल्ह्यात कार्य करणार आहे. (पेट्रोल वाहन वापरल्यास २० रुपये दंड)

चंद्रपूरमध्ये Khalsa Help Foundation च्या नवीन कार्यकारणीची घोषणा

खालसा हेल्प फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुप्रीतसिंग रम्मी यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख तेजिंदर डिंग दारी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अर्जुनसिंग धुन्ना यांनी चंद्रपूर जिल्ह्याची कार्यकारणी घोषित केली.

या कार्यकारणीमध्ये विदर्भ अध्यक्ष बलबीर सिंग गुरो, चंद्रपूर शहर अध्यक्ष पूरन सिंग जुनेजा, युवा जिल्हा अध्यक्ष गुरजीत सिंग गढोक, सिगलीगर शीख सेल युवा विदर्भ अध्यक्ष नितुसिंग बावरे, गडचांदूर शहर अध्यक्ष गुरुप्रीत सिंग सचदेव, राजुरा शहर अध्यक्ष हरभजन सिंग भट्टी, घुग्गुस शहर अध्यक्ष दीपक अनेजा, हरदीप सिंग सहानी उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष व विदर्भ सचिव म्हणून सोनू अनेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.    

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment