Chandrapur Crime : चंद्रपूर - शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली असून यामध्ये ५ लक्ष ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबविला, चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील अभियंता ३० वर्षीय शुभम बारधमवार यांच्या चिंतामणी रेसिडेन्सी फ्लॅट क्रमांक ४ वडगाव मध्ये ही चोरी झाली. ६ फेब्रुवारीला सायंकाळी बारधमवार हे आपल्या कुटुंबासह मामाच्या मुलाचे लग्नाला राजुरा येथे निघाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरफोडी झाली असल्याची बाब शुभम यांच्या चुलत भावाने दिली. (चंद्रपूर पोलिसांनी लाखोंचा केबल जप्त करीत टोळक्याला केली अटक)
शुभम बारधमवार यांनी ६ फेब्रुवारीला मामाच्या घरी मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे चुलत भाऊ अभिषेक बारधमवार यांनी फोन करीत माहिती दिली कि घरातील लॉक तुटलेल्या अवस्थेत असून घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीमध्ये आहे.
माहिती मिळताच शुभम हे घरी आले असता त्यांनी बेडरूम मधील कपाटातील लॉक बघितले त्याचा लॉक तुटलेला होता, लॉकर मधील सोन्या - चांदीचे सह रोख रक्कम असा एकूण ५ लक्ष ४७ हजार रुपयांचा माल चोरीस गेला, याबाबत रामनगर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. Chandrapur Crime
पोलिसांनी पंचनामा करीत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये काही इसम चोरी करताना दिसत होते, यापूर्वी सुद्धा अश्याच पद्धतीने सिनर्जी वर्ल्ड मध्ये घरफोडी झाली होती, त्याच टोळक्याने पुन्हा चंद्रपुरात हि घरफोडी केली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. चंद्रपूर शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांनी नियमित गस्तीची मागणी केली आहे.
Leave a Comment