महागाईने गृहिणींचे बजेट कोलमडले: चंद्रपूर पेट्रोल पंपावर काँग्रेसचा हल्लाबोल

May 20, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूटमार करण्याचे धोरण सुरू केले आहे. या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असून, यामुळे महिलांचे घरगुती आर्थिक बजेट पूर्णपणे बिघडले आहे. या वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज चंद्रपुरात महिला काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. (चंद्रपुरातील गुन्हेगारांची पोलीस अधीक्षकांनी घेतली परेड)

 

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. संध्याताई सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार, तसेच काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते व आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार आणि खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन पार पडले. चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोल पंपावर ग्रामीण जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष ॲड. कुंदाताई जेणेकर आणि शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. चंदाताई वैरागडे यांच्या संयुक्त नेतृत्वात हे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

 

आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेतला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

"इंधन दरवाढीमुळे देशातील प्रत्येक गृहिणीचे बजेट कोलमडले असून, मोदी सरकारला सर्वसामान्यांच्या सुखाशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही," असा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

या आंदोलनाला चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष संतोषभाऊ लहामगे, प्रवीणभाऊ पडवेकर, ज्येष्ठ नेते व मनपाचे माजी विरोधी पक्षनेते राजेशजी अडूर, महिला बाल कल्याण सभापती सौ. संगीताताई भोयर, नगरसेवक सचिनजी कत्याल, सुनंदाताई धोबे, अश्विनीताई खोब्रागडे आणि वनश्रीताई मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

तसेच तालुका अध्यक्ष अनिलभाऊ नरुले, मनीषजी तिवारी, प्राचार्य नरेंद्रजी बोबडे, रामकृष्णभाऊ कोंद्रा, उमाकांतजी धांडे, तवंगर खान, दीपकजी मित्रा, गुंजनभाऊ येरमे, देवानंदजी लेडांगे, मोनू रामटेके, सुरेशजी विधाते, यश दत्तात्रय, अजयजी महाडोळे, काशिनाथ बोरकर, निसार शेख, अतुल पिंपळकर, केशव रामटेके, मीनाक्षीताई गुजरकर, शालिनीताई भगत, प्रतिभाताई पेंदाम, रेखाताई बारसागडे, संध्या पिंपळकर, पायलताई दुर्गे, उज्वलाताई कार्लेवार, वर्षाताई बोथले, कविताताई बावणे यांच्यासह काँग्रेस व महिला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

+