गडचांदूर (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या सुगंधित तंबाखूच्या धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने प्रहार करीत भद्रावती नंतर आता गडचांदूरात गुन्हे शाखेने कारवाई करीत १ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१९ मे रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली कि, नांदा मध्ये राहणारे समीर अहमद सिद्दीकी यांनी आपल्या राहत्या घरी सुगंधित तंबाखू विक्री करण्यासाठी साठवणूक करून ठेवली आहे. (चंद्रपुरात ५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त)
माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्दीकी च्या घरी धाड मारली, सिद्दीकी यांच्या राहत्या घरी असलेले पान मटेरियल स्टोर्स च्या दुकानात एक इसम ५५ वर्षीय सगीर अहमद सिद्दीकी मिळून आला. घराची झडती घेतली असता ईगल तंबाखूचे ५१ पॉकिट, ४० ग्राम वजनाचे ४९ पॉकिट, ईगल तंबाखूचे १६ डब्बे, मजा १०८ चे ३१ डब्बे, क्रेज तंबाखू चे ११ पॉकिट, होला कंपनीचे ९३ पॉकिट, व्ही १ कंपनीचे १४७ पॉकिट, राज निवास कंपनीची सुगंधित सुपारी २९ पॉकिट, झेड एन ०१ कंपनीचे सुगंधित जर्दा ३३ पॉकिट, सितार कम्पनीची सुगंधित सुपारी ५ पॉकिट, राजश्री कंपनीची सुगंधित सुपारी १० पॉकिट व विविध कंपनीचे तंबाखू व पान मसाला असा एकूण १ लाख ३९ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
हा सर्व मुद्देमाल २५ वर्षीय समीर अहमद सिद्दीकी यांचा असून ते घरी मिळून आले नाही, समीर वर गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ३०(२), (a), २६(२) (i), २६ (२) (iv), ५९, बीएनएस २०२३ अधिनियम कलम २२३, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे यांनी केली.
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी सुगंधित तंबाखूच्या ६ कारवाया केल्या, ज्यामध्ये सिंदेवाही २, मूल १, रामनगर १, भद्रावती १ व गडचांदूर १ चा समावेश आहे. या कारवाईत सुगंधित तंबाखू माफिया जयसुख ठक्कर, वसीम झिमरी हे फरार आहे.
Leave a Comment