Maharashtra Police Arrests : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडी सारखा गुन्हा करीत धुमाकूळ माजविणाऱ्या शेट्टी गॅंग चा अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला, जिल्ह्यातील मूल व सावली तालुक्यात २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून याप्रकरणी १६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली कि चंद्रपूर जिल्ह्यात घरफोडी करणारा शेट्टी गॅंग चा अट्टल आरोपी शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी हा नागपुरात आहे, गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातील दिघोरी मध्ये धडक देत शेट्टी ला अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यात शेट्टी घरफोडीचे गुन्हे करीत नागपुरात पळून जात होता.
सावली व मूल तालुक्यात २ घरफोडीच्या घटना घडल्या होत्या, आरोपीने नागपुरातील तीन सोनाराकडून चोरी व सोनाराला विक्री केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची लगड एकूण ११२ ग्राम सोने किंमत एकूण १६ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले.
रेकॉर्डवरील अट्टल शेट्टी गँगचा रमेश शेट्टी वर अटकेची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सचिन मुसळे, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, मोहन दासरवार, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल गारघाटे, अजित शेंडे, सुमित बरडे, धीरज पिदूरकर, अशोक मडावी, मिलिंद टेकाम, गजानन मडावी यांनी केली.
Leave a Comment