Mahila Takrar Nivaran Kendra : चंद्रपूर - आज संपूर्ण राज्यात भोंदू बाबा अशोक खरात चे प्रकरण गाजत आहे,अनेक महिलांनावर भोंदू बाबाने लैगिक अत्याचार केल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत आणि भीती निर्माण झाली आहे. आज महिलांची सुरक्षा करण्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकार कमकुवत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता अंधश्रद्धा निर्मूलन,महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यासारखे उपक्रम राबवून महिला तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस महिला अध्यक्षांना दिल्या. (चंद्रपूरच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी स्वीकारला पदभार)
त्यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर (जिल्हा)महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ चंदाताई वैरागडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन,महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण यावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ सुनिताताई लोढिया, मार्गदर्शक ऍडव्होकेट मा.वैशाली टोंगे आणि मा.प्रा,वैशाली तुमराम, पब्लिक हेल्थ नर्स मा.संगीता जवादे,यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात महिलांना वैशाली टोंगे,प्रा वैशाली तुमराम यांनी देशात आणि राज्यात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार यावर प्रकाश टाकून महिलांनी अत्याचार विरोधी भूमिका घेऊन संघर्ष करण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे.
भोंदू बाबा महिलांना विविध प्रलोभन देऊन आपल्या जाळ्यात ओढून महिलांचा बळी घेत आहे याचाही भांडाफोड झाला पाहिजे ,सौ सुनीता लोढिया यांनी महिलांनी यापुढे अन्याय अत्याचाराविरोधात आक्रमक भूमिका घेऊन महिला संघटन मजबूत केले पाहिजे तेव्हाच आपण सुरक्षित राहू असे विचार व्यक्त केले. शहर अध्यक्षा सौ. चंदाताई वैरागडे यांनी प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ संध्याताई सव्वालाखे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या सुरक्षेतेसाठी उचलेले पाऊल म्हणजे आम्हा महिलांसाठी ऊर्जा आणि एक नवी दिश्या देण्याच महान कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आज या ठिकाणी आम्ही महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि सक्षमीकरण करण्यासाठीच कार्यक्रमाच आयोजन केले. Mahila Takrar Center
यापुढे महिलांवरील होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शहर महिला काँग्रेस कमिटी तर्फे महिला तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असून यापुढे कोणत्याही महिलेवर अन्याय अत्याचार झाल्यास तत्काळ तक्रार निवारण केंद्राला माहिती द्यावी आम्ही निश्चितच त्या महिलेला यथा योग्य न्याय देऊ असे मौलिक विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाला महिला काँग्रेस पदाधिकारी सौ.प्रतिभाताई पेंदाम, आरती खनके, वर्षाताई बोथले,उज्वला कार्लेकर, रेशु बिटे, भावना वाटघुरे, उषा तंगडपल्लीवर सोबतच कार्यकर्त्या तसेच सामाजिक संघटनेचा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,कार्यक्रमाच्या शेवटी मा संध्याताई सव्वालाखे मॅडम च्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना थंड पेय वाटप करण्यात आले.
Leave a Comment