Rambagh Ground Chandrapur inspection by Pappu Deshmukh

चंद्रपूर रामबाग मैदानावर चिखल आणि पाण्याचे साम्राज्य; खेळाडूंच्या तक्रारीनंतर नगरसेवक पप्पू देशमुखांची धाव

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 6, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध (Rambagh Ground Chandrapur) ऐतिहासिक रामबाग मैदान सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे स्थानिक खेळाडू व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत, खेळाडूंच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेतील महानगर आघाडीचे गटनेते तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांची भेट घेतली व मैदानाची पाहणी करण्याची आग्रही मागणी केली. (दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा विजेत्यांना पुरस्कार वितरित)

चंद्रपूर शहरातील निसर्गरम्य रामबाग मैदान विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे खेळाडू व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत खेळाडूंच्या एका शिष्टमंडळाने महानगरपालिकेतील महानगर आघाडीचे गटनेते तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांची भेट घेऊन मैदानाची पाहणी करण्याची मागणी केली.

या मागणीनुसार नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज, दि. 6 जुलै रोजी सकाळी सुमारे 10 वाजता खेळाडूंसह रामबाग मैदानाची पाहणी केली. यावेळी जनविकास सेनेचे प्रफुल्ल बैरम तसेच कोमिल मडावी, करण शेलोकर, श्रुतिक वरघणे, सर्वेश पेंदाम, पवन राजूरकर, गणेश भेंडारकर, संजय तीतरे, अमन चुंचुवार, यश सोनुले, देवांश शेलोकर इत्यादी खेळाडू उपस्थित होते.

Rambagh Ground Chandrapur खेळाडूंच्या विविध समस्यांच्या विळख्यात

पाहणीदरम्यान मैदानाभोवतीच्या रनिंग ट्रॅकवर अनेक ठिकाणी चिखल तयार झाल्याने व मैदानात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने खेळाडूंना सराव करताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाकडून मैदानाच्या मागील बाजूने वाहने आणण्यास अडथळे निर्माण होत असल्याची तक्रारही खेळाडूंनी केली. तसेच मूल मार्गावरून मैदानाकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयनीय असल्याचे यावेळी समोर आले.

वन विभाग, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी उपस्थित खेळाडूंच्या शिष्टमंडळाला दिले.

यापूर्वी रामबाग मैदानाच्या मध्यभागी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारण्यात आल्यानंतर तो खड्डा बुजविण्यात आला आणि प्रस्तावित इमारतीचे बांधकाम मैदानाच्या बाहेरील जागेवर स्थलांतरित करण्यात आले.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment