News34
चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर दारू खरेदीसाठी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार आज 16 ऑगस्ट बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाचे वाहन शहरातील एक वाइन शॉप जवळ उभे करीत वाहन चालक थेट दारूच्या दुकानात शिरला व दारू खरेदी करीत पुन्हा वाहनात जाऊन बसला.
हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे, त्यावेळी त्या वाहनात एक कर्मचारी बसून होता, विशेष बाब म्हणजे बुधवारी सुट्टीचा दिवस असतांना ही गाड़ी शहरात आली कशी? आणि त्यात बसलेला तो कर्मचारी कोण? सदर दारू कुणासाठी खरेदी करण्यात आली? असा प्रश्न काही कर्मचारी करत आहे, यापूर्वी सुद्धा अनेक वेळा वेकोलीच्या वाहनाच्या सर्रासपने दुरुपयोग करण्यात आला परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्या मुळे आता थेट दारू खरेदी करण्यासाठी वेकोलीच्या वाहनाचा वापर केल्या जात आहे
