News34
बल्लारपूर – सध्या राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, सर्वात जास्त अपघाताचा कहर तर समृद्धी महामार्गावर सुरू आहे, मात्र अनेक मार्गावर अपघाताच्या घटना घडत असून त्यामध्ये अनेकांचा नाहक जीव जात आहे.
बल्लारपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच 34 बीझेड 0009 चा सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील जाम समोरील कांदळी गावाजवळ अपघात झाला. या अपघातात पेपर मिल इन्स्ट्रुमेंट विभागात कार्यरत धीरज कुलकर्णी (48) यांचा मृत्यू झाला. चालकासह 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराजा ट्रॅव्हल्सची ही बस बल्लारशाह येथून सकाळी 7 वाजता नागपुर साठी निघाली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील जाम जवळील कांदली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर बसची धडक झाली. या अपघातात बसची केबिन चाके उडून गेली. गंभीर जखमी ड्रायव्हर, कंडक्टर आणि प्रवाशांना नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक तपासणी आणि उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
