तळोधी पोलीस स्टेशनच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

News34

(प्रशांत गेडाम)
नागभीड – तळोधी पोलीस स्टेशन च्या वतीने ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाचे औचित्य साधून देशाची स्वतंत्रता व तिच्या गौरव याच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांची 14 वर्षे आतील वयोगट व 19 वर्ष आतील वयोगट अशा दोन गटांमध्ये दोन किलोमीटर व चार किलोमीटर दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये तळोधी येथील महात्मा फुले विद्यालय, लोक विद्यालय,विश्वज्योती कॉन्व्हेंट,जवाहर नवोदय विद्यालय,गोविंदप्रभू महाविद्यालय असे पाच शाळा व महाविद्यालयातील अंदाजे 300 हुन अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

सदर स्पर्धेच्या प्रसंगी पोलीस स्टेशन तळोधी येथील ठाणेदार मंगेश भोयर, पोलीस उपनिरीक्षक सहदेव गोवर्धन,पोलीस उपनिरीक्षक भास्कर पिसे,अंमलदार विजय उराडे,संजय मांढरे,सरोते,सतीश नेवारे, रत्नाकर देहारे,मंगाम, सुधाकर भानारकर,बांबोडे, आत्राम,विजय वाकडे, हंसराज सिडाम, तसेच संबंधित शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!