खड्डे चुकविताना बस शिरली शेतात आणि

News34 chandrapur

चिमूर – चिमूर तालुक्यातील शंकरपुर जवळील कवडसी देश रस्त्यावरील खड्डे चुकवीताना बस शेतात उतरल्याने विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन चिमूर – काम्पा मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

 

चिमूर वरून कामपा जाणार हा रस्ता मागील एक वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी सामाजिक संघटनेसोबत राजकीय पक्ष्यांनी सुद्धा निवेदन देऊन आंदोलन केले आहे. परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही.

 

या अपघातामुळे कितीतरी अपघात झाले आहेत. आज दिनांक १९ डिसेंबरला सकाळी ८ वाजता चिमूर वरून भंडारा करिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात घुसली. या बस मध्ये ७० प्रवासी होते. शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंक्ररपुर येथे उपचार सुरू आहे.

 

या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांचे नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर बांधकाम विभाग अभियंता समीर उपगणलावार आंदोलन स्थळी पोहचले. यावेळी डॉ सतीश वारजूकर यांनी २३ डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट दिला. बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले

Leave a Comment