Maharashtra tourism tadoba : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

Maharashtra tourism tadoba राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटन दरम्यान पर्यटक व जिप्सी चालकांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे, सकाळी सफारी दरम्यान पर्यटकांच्या गराड्यात वाघ फसलेला दिसला, यावर ताडोबा दंडात्मक कारवाई करीत वाहन चालकांना कायमची बंदी करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणी गणना

Maharashtra tourism tadoba 26 मे रोजी वृत्तपत्रात सदर वाघाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता, त्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाणे दखल घेतली, सदर फोटो हा 17 मे रोजी ताडोबा कोअर क्षेत्रातील खातोडा ते ताडोबा मार्गावरील सकाळ फेरी दरम्यानचा होता, ताडोबा प्रशासनाने 10 जिप्सी वाहन व जिप्सी चालक यांच्यावर 3 हजार दंड ठोठावीत त्यांना 1 महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, काही पर्यटन चालक हे हंगामी असल्याने त्यांना कायमचे बंद करीत मार्गदर्शक यांच्यावर 1 महिण्याकरिता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटीचे चोर बीटी बियाणे जप्त

भविष्यात अश्या घटना जिप्सी वाहन चालकांकडून होणार नाही यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या असून पावसाळ्याच्या सुट्टीत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!