Wildlife census tadoba : ताडोबा अभयारण्यात वन्यप्राण्यांची गणना संपन्न

Wildlife census tadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बुद्धपौर्णिमेला (दिनांक २३/०५/२०२४ दुपारनंतर ते २४/०५/२०२४ सकाळपर्यंत) आयोजित निसर्गानुभव उपक्रम यशस्वीपणे सपंन्न झाला.

अवश्य वाचा : चंद्रपुरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ

व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात भारतातील विविध राज्यांतील निसर्गप्रेमींनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. बफर क्षेत्रातील एकूण ६ वनपरिक्षेत्रांतील ७९ मचाणी उभारल्या होत्या आणि या मचाणींवर एकूण १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचा-यांच्या सोबत बसून प्राणी गणना केली. याशिवाय कोर विभागातील ५ वनपरिक्षेत्रांतील एकूण ७६ मचाणींवर बसून वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना केली.

 

आनंदाची बातमी : राज्यातील मुलींना मिळणार उच्चशिक्षण अगदी मोफत

Wildlife census tadoba या निसर्गानुभव उपक्रमादरम्यान बफर क्षेत्रात २६ वाघांची व ८ बिबट्यांची नोंद झाली तर कोर क्षेत्रात २९ वाघांची व ९ बिबट्यांची नोंद करण्यात आली. याशिवाय बफर क्षेत्रात १७ रानकुत्रे, ३२ अस्वल, ४०३ चितळ, १६६ सांबर, ३४४ गवे असे सर्व मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी मिळून एकूण १,९७७ प्राण्यांची नोंद झाली आहे. कोर क्षेत्रात २९ वाघ, ९ बिबट, ६९ रानकुत्रे, ३३ अस्वल, २१५ गवा, १०५५ चितळ, ३२२ सांबर असे सर्व मिळून ३,०९२ प्राण्यांची नोंद झाली आहे.

महत्त्वाचे : वर्ग 12 वी नंतर हे कोर्स कराल तर आयुष्यात यशस्वी व्हालं

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल, १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ गवे अशा एकूण ५,०६९ मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे.
बफर क्षेत्रात निसर्गप्रेमींच्या सहभागातून, तर वन कर्मचा-यांच्या सहभागातून कोर क्षेत्रात निसर्गानुभव कार्यक्रम सपंन्न झाला.

 

Wildlife census tadoba सदर उपक्रम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक कोर व बफर यांच्या सूचनेनुसार पार पडला.

 

ताडोबा प्रशासनाला उशिरा जाग

राज्यातील विविध अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला मचान पर्यटन पार पडले, दुसऱ्या दिवशी वनविभागाने पत्रकारांना प्राणी गणनेबाबत सविस्तर माहिती दिली, मात्र यामध्ये ताडोबा प्रशासन नेहमीप्रमाणे मागे राहिले. प्राणी गणनेबाबत माहिती घेण्यासाठी वन अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून सम्पर्क साधला मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मे रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ताडोबा ग्रुप मध्ये पत्रकारांच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यानंतर वनप्रशासनाने याबाबत माहिती दिली.

 

ताडोबा अभयारण्य हे जगप्रसिद्ध आहे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा चंद्रपूर, मात्र वनमंत्री मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातच वन विभागाचे अधिकारी प्रसार माध्यमांना माहिती देण्यापासून टाळाटाळ करतात हे विशेष.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!