Thursday, June 20, 2024
Homeमराठी ब्लॉग पोस्टFree higher education for girls : मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार अगदी मोफत

Free higher education for girls : मुलींना आता उच्चशिक्षण मिळणार अगदी मोफत

- Advertisement -
- Advertisement -

Free higher education for girls 12 वी चा निकाल लागल्यावर पालकांची पुढच्या प्रवेशासाठी लगबग सुरू होते, कोणता कोर्स करायचा? खर्च किती? याबाबत पालक जणू कचाट्यात पडतात, शिक्षणाचे शुल्क जास्त असले की पालक कमी खर्च असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, मात्र आता पालकांना ही चिंता सोडावी लागणार आहे, कारण आता मुलींना उच्चशिक्षण अगदी मोफत मिळणार आहे, कसं सविस्तर वाचा.

अवश्य वाचा : विज्ञान शाखेच्या मुलांनी या कोर्स ची करावी निवड, मिळेल भरघोस पगार

Free higher education for girls बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार असून या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) होणार आहे.

महत्वाची माहिती : घरी बसून क्लिक करा, आणि मिळवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

बारावीनंतर पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने उच्चशिक्षणातील तब्बल ६४२ कोर्सेसचे शुल्क शासन भरणार आहे.

 

लक्षात ठेवा..! राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल २० लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. हुशार असूनही आर्थिक अडचणींमुळे उच्चशिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायमचीच दूर होणार आहे.

 

निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का?

 

Free higher education for girls इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेतानाच शैक्षणिक शुल्क भरावे लागते. पण, आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये “मुलींना उच्चशिक्षण मोफत’चा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफच मिळेल हे निश्चित आहे. पण, हा निर्णय कोणत्या मुलींसाठी (जात संवर्ग) लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल, यासंबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच होणार आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!