Accident in chandrapur city : प्रियदर्शिनी चौकात अपघात, 3 जखमी

Accident in chandrapur city चंद्रपूर – शहरातील प्रियदर्शिनी चौक हा अतिवर्दळीचा भाग आहे मात्र आज या चौकात भर दुपारी ट्रॅक्टर व दुचाकी वाहनाचा अपघात झाला, या अपघातात 3 नागरिक जखमी झाले.

अवश्य वाचा : ठाकरेंचे उपोषण वडेट्टीवार यांनी सोडविले

दुपारी एकाच दुचाकीवर 26 वर्षीय अजय गुरनुले, 40 वर्षीय चालूनंदा चंद्रशेखर गुरनुले व 40 वर्षीय जीवनमाला गुरनुले हे डोंगरगाव ला जात होते, त्याच दरम्यान मुख्य बस स्थानक मार्गावरून पाणी टंकी जवळ जाणारा ट्रॅक्टर क्रमांक MH34AP 1648 ने दुचाकी वाहनाला जोरदार टक्कर मारली.

या धडकेत दुचाकी वाहनांवर असणाऱ्या तिघांना गंभीर दुखापत झाली, धडक इतकी जोरदार होती की दुचाकी थेट ट्रॅक्टर मध्ये शिरली.

अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

Accident in chandrapur city अचानक झालेल्या या अपघातात नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावीत तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.

अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गाडे हे आपल्या चमूसहित पोहचले.
पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!