Unemployment in chandrapur : स्मार्ट वीज मीटर मुळे चंद्रपुरात बेरोजगारी वाढणार – महेश मेंढे

Unemployment in chandrapur चंद्रपूर : – वीज ग्राहकांकडे आता ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’ लागणार आहे. हे काम अदानींसह एकूण चार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. या मीटरमुळे मीटर रिडिंग, देयक वाटप ही कामे बंद होणार असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे मोठे संकट आले आहे.

कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुकूम परिसरातील मीटरची पाहणी केली असता काही बाबी समोर आल्या आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील प्रियदर्शिनी चौकात अपघात, 3 जखमी

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मोठे जनआंदोलन उभारू असे म्हणत आमच्या योजनेला विरोध असून सदर कारवाई तात्काळ थांबावी असे काँगेसचे महेश मेंढे म्हणाले. यावेळी MSEDCLमीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सदर जनआंदोलनास पाठिंबा दिला आहे.

अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

Unemployment in chandrapur वास्तविक वीज मीटर निवडी बाबत वीज कायदा 2003 कलम 55 नुसार ग्राहकांना स्वातंत्र आहे . मात्र वीज वितरण कंपनी कडून स्मार्ट वीज मीटर लावण्यासाठी ग्राहकांच्या घरोघरी सर्व्हे करण्यात येत असून स्मार्ट मीटर लावणे एकप्रकारे बंधनकारक असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे . ग्राहकांना वेठीस धरण्याच्या महावितरणच्या या धोरणाला आम्ही विरोध दर्शवित आहोत असे मेंढे यावेळी म्हणाले.
आधी ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून व्हायची. या कंत्राटदारांनी हजारो कामगारांना यासाठी रोजगार दिला. परंतु स्मार्ट मीटरमुळे आता हे सर्वच कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकार राज्यात जास्तीत जास्त रोजगार देण्याची गोष्ट करतात तर दुसरीकडे आम्हाला बेरोजगार केले जात आहे, असा आरोपही कंत्राटी कामगारांनी केला आहे. यासाठीच आम्ही महेश मेंढे याचे नेतृत्वात जनआंदोलन उभारत असल्याचेही बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मीटरच्या संकल्पनेला राज्यातील वीज संघटनेचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे.

अवश्य वाचा : विजय वडेट्टीवार यांच्या एंट्रीने ठाकरेंचे उपोषण सुटले

Unemployment in chandrapur यावेळी MSEDCLमीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सदर जनआंदोलनस पाठिंबा दिला आहे. महेश मेंढे सोबत सुधीर बारसागडे, मंगेश माणिक खोब्रागडे, सुनील समर्थ, निलेश रामटेके, संदीप घोंगरे, सुशील बोकडे, आनंद टिपले, धम्मदीप दुर्योधन, करण तरारे , अनिल क्षीरसागर, राकेश शिकणम, कुणाल गवई, प्रीतम रायपुरे, मयूर बॉंडबैले, आशिष गेडाम, हेमचंद्र मेश्राम, कुणाल बोरकर, राजू बोरकर, अजहर खान यांची उपस्थिती होती.

ग्राहकांचे गणित बिघडणार
शेतीचे वीजग्राहक वगळता घरगुती, व्यापारी, औद्योगिक वीजग्राहकांसह फीडर आणि रोहित्रांवरसुद्धा स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्यादृष्टीने ठेकेदाराने फीडर आणि रोहित्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरावे लागतील. किती वीज वापरली, किती रक्‍कम शिल्लक आहे. याची माहिती ग्राहकांना मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना समजणार आहे. सध्याच्या पद्धतीत मीटर रिडींग घेऊन मोठे बिल आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते.

Leave a Comment

error: Content is protected !!