Aditya Thackeray Yuva Sena 13 जूनला युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी गुणवंतांचा सत्कार, पक्षप्रवेश व शाखा उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भव्य कार्यक्रमांच्या शृंखलेत परिस्थितीवर मात करीत वर्ग 10 व 12 वित यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
राजकीय : ठाकरेंचे उपोषण विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी सोडविले
Aditya Thackeray Yuva Sena वर्ग 12 वी मध्ये सिद्धार्थ वासाडे, मिस्टी कुचनकर, शेजल पिठचुरे, महेश चांदेकर, तर वर्ग 10 वी चे गायत्री पोंगले, महेश देवनाथ, अदिती रामटेके, सोयम पाटील, संकेत तिवाडे या गुणवंतांचा सत्कार युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला, पुढील अभ्यासक्रमात काही अडचणी उदभवल्या तर युवासेना सदैव तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
महत्त्वाचे : हवामान खात्याचे अलर्ट आपल्याला काय सांगतात?
शहरातील जलनगर येथे युवासेना शाखा फलक अनावरण सोहळा पार पडला, आयोजित फलक अनावरण कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे,प्रमोद भाऊ पाटील शिवसेना विधानसभा प्रमुख,वसीम खान,इलियास शेख,सिकंदर खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
Aditya Thackeray Yuva Sena शाखा फलक उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शाखा प्रमुख म्हणून धम्मपाल नगराळे, उपशाखा प्रमुख लोकेश किठे, शाखा सचिव अमित कुमरे यांची निवड करण्यात आली*.
शाखा सदस्य म्हणून बंटी किठे, शुभम फुलझेले, संदेश फुलझेले, धबू चिवंडे, राहुल यादव, चिंटू यादव, सचिन गणवीर, सोनू कांबळे, पिंटू तलांडे, शुभम केटे, इम्रान खान, पवन पाटील, सज्जन कांबळे, मंडी कांबळे, तौसिफ़ खान, आसिफ खान, सोहेल पठाण, विकी गिरडकर, पंकज पाटील, प्रियंका कांबळे व अक्षता चिवंडे यांची निवड करण्यात आली. आयोजित शाखा फलक उदघाटन कार्यक्रमात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
महत्त्वाचे : या निर्णयाने चंद्रपुरात वाढणार बेरोजगारी
कार्यक्रमाच्या शेवटी चंद्रपूर तालुक्यातील चिंचोली, वढोली व कढोली येथील युवकांनी युवासेनेत प्रवेश केला.
चिंचोली येथील करन साव, विजय गेडाम, अजय गेडाम, आशिष गेडाम, सूरज गेडाम, पंकज पेंदोर, धीरज गेडाम, आझाद असुट्कर, शुद्दोधन आसुटकर, भारत शेंद्रे, सूरज रत्नपारखी, सुमित मानकर, शुभम गेडाम, आर्यन रत्नपारखी, रोहन जुमनाके, सागर दहागावकर व मन गेडाम यांनी प्रवेश केला.
Aditya Thackeray Yuva Sena तर वढोली-कढोली गावातील साहिल उपरे, पवन तोडासे, वैभव उपरे, प्रवीण तुराणकर, प्रदीप गेडाम, निखिल रोगे, विखील रोगे, राकेश गोचे, लक्ष्मण नेहारे, धम्मदीप खोब्रागडे, चैतन्य खोब्रागडे, गणेश गोचे, प्रफुल गोचे, रोहित किन्नाके, रोहित धवडे, शुभम कुचनकर, सुरेश परचाके, अरुण येडमे, दशरथ पेंदोर, ऋषी येडमे, अमर येडमे, देविदास नेहारे व रुपेश ताजने यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या हस्ते युवासेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल उर्फ बंटी कमटम, युवासेना शहर प्रमुख शहबाज शेख,युवासेना शहर प्रमुख वैभव काळे,युवासेना तालुकाप्रमुख सुरज शेंडे, उपतालुकाप्रमुख विवान रामटेके, उपशहर प्रमुख स्वप्निल पाटील,विभाग प्रमुख सागर धनकसार यांची उपस्थिती होती.