Rajura Assembly Constituency राजुरा — राजुरा तालुक्यातील विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या जनतेच्या समस्या आणि प्रगतीपथावर असलेल्या निर्माण कामांबाबत आमदार सुभाष धोटे यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात आढावा सभा घेऊन जनतेशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
महत्त्वाचे : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी
यामध्ये राजुरा तालुक्यातील अतिवृष्टी व खरवडून झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान, चिंचोली येथील चक्रीवादळाने झालेले नुकसान, ३३३ बटे २ ची मोजनी, कृषी पंपांची विज जोडणी, पांदन रस्त्यांची अर्धवट कामे पूर्ण करणे, शहरी व ग्रामीण भागातील घरकुल पुर्ण करणे, रोजगार हमी, मनरेगा ची कामे सुव्यवस्थेतपणे करणे, वेकोली प्रभावीत गावांमध्ये थाईराईडयुक्त पाणी पुरवठाबाबत प्रभावी उपाययोजना करणे, नागरिक आरोग्याच्या दृष्टीने नाली, गटारे सफाई, धूर फवारणी करणे, जल जीवन ची कामे पूर्ण करून गावागावांत फोडलेले रस्ते अध्ययावत करणे, भ्रष्टाचाराची चौकशी करणे, शुध्द पाणी पुरवठा करणे, रॅशन कार्ड तातडीने वाटप करून अन्नपूरवठा यंत्रणा सुव्यवस्थित करणे, चढ्या भावाने व बोगस बियाण्यांची होणाऱ्या विक्रीवर आळा घालणे, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरू ठेवणे इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश आ. सुभाष धोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अवश्य वाचा : जिल्ह्यातील कामगाराने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिला इशारा
Rajura Assembly Constituency या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, प्रभारी तहसीलदार डोणगावकर, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, बांधकाम अभियंता खापणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक आनंद दासरी, संचालक संतोष इंदूरवार, अँड. रामभाऊ देवईकर, धनराज चिंचोलकर, इरशाद शेख, प्रा. प्रफुल्ल शेंडे, चेतन जयपूरकर, मारोती मोरे, संजय कुडमेथे यासह कृषी, पंचायत, विद्युत, आरोग्य, पोलीस, वन, अन्न पुरवठा, महसूल, नगरपरिषद यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.