Nature communications
Nature communications : चंद्रपूर शहराच्या निसर्गरम्य वातावरणात आणि जंगल भागात असलेल्या ऐतिहासिक जलमहल परिसरात असलेल्या जुनोना तलाव परिसरात, इको प्रो संस्था आणि पर्यावरणवाहिनी संस्था बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पक्षी निरीक्षण, जंगल भ्रमंती व निसर्ग संवाद शिबिर’ आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण संरक्षण, पक्षी निरीक्षण आणि जंगलातील जैवविविधतेबद्दल जनजागृती करणे हे होते. या शिबिरात स्थानिक चंद्रपूर व बल्लारपूर मधील पर्यावरणप्रेमीं नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात पक्षी निरीक्षण, वनस्पती ओळख, जंगलातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच, शिबिरात वन्यजीव आणि त्यांच्या संरक्षणाबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. Natur lover
चंद्रपुरात सकल हिंदू समाजाची न्याय यात्रा
इको प्रो संस्था व पर्यावरण वाहिनी संस्था यांच्याकडून उपस्थितांना जंगलातील सजीवांचे आणि वनस्पतींचे एकंदरीत जैवविविधतेचे महत्व सांगितले गेले, तसेच या निसर्गसंपन्न परिसराची स्वच्छता राखण्याची आवाहन करण्यात आले.

यावेळी तलाव परिसरात वनभोजन व पार्टी करणारे कडून फेकले जाणारे युज अँड थ्रो प्लास्टिक चे कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. तलाव परिसरातील, तसेच तलावात असणारी पक्षी यांचे निरीक्षण करण्यात आले, यावेळी पक्षीमित्र सदस्यांनी शिबिरार्थीना पक्षी विषयी माहिती दिली, जैवविधतेत पक्षाचे महत्व त्यांचे हिवाळ्यात होणारे हजारो किमी चे स्थलांतर बाबत माहिती दिली. Junona lake
शिबिराच्या समारोपाच्या वेळी, पर्यावरणीय संवेदनशीलतेचा संवर्धन करणाऱ्या विविध उपक्रमांचे महत्त्व दर्शवण्यात आले आणि सर्व उपस्थितांना निसर्गाशी संलग्न राहण्याचे प्रेरणा देण्यात आली.
उपस्थित इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे तर पर्यावरणवाहिनीचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ गुरुजी यांनी सहभागीना यावेळी निसर्ग-पर्यावरण-जैवविविधता आणि आपले कर्तव्य यासोबतच जिल्ह्यातील पर्यावरणीय परिस्थिती याविषयी संवाद साधण्यात आला.
या शिबिरात साठ पेक्षा अधिक पर्यावरणप्रेमींचा सहभाग होता, पक्षी निरीक्षणात ढगाळ वातावरण व थंडी कमी असल्याने आज पहाटे फार कमी पक्ष्यांचे निरीक्षण करता आले. जंगल भ्रमंतीत विविध वनस्पती व प्राणी प्रजातींची माहिती जाणून घेता आले.

तसेच, या शिबिराच्या आयोजनामुळे स्थानिक नागरिकांच्या पर्यावरणीय जाणीवेत आणि संरक्षणातील सक्रियतेत वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शिबीर यशस्वी करण्यास पर्यावरणवाहिनीचे प्रकाश नरसिंगोज, मनोहर मांडेकर, संजय तेलारकर, समीर शेख, विवेक खुटेमाटे, कार्तिक वराटे, केशव ठिपे, भास्कर फरकाडे, हेमराज गेडाम, जितेश गेडाम तर इको-प्रो चे सचिन धोतरे, कुणाल देवगिरकर, सुनील लिपटे, सुरज कावळे, आशिष मस्के, हेमंत बुरडकर, कपिल चौधरी, राजू काहिलकर, रुद्राक्ष धोतरे, चित्राक्ष धोतरे यांनी सहकार्य केले तर अनेक विद्यार्थी, मुले, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
