Arya Vaishya OBC Inclusion
Arya Vaishya OBC Inclusion : चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना आक्रमक विरोध करणाऱ्या ओबीसी समाजाने आता आर्य वैश्य (कोमटी) समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींविरोधात आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जनता कॉलेज चौकात निदर्शने करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.
शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत
राज्य शासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, इतर कोणत्याही समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले जाणार नाही. यासंदर्भात शासनाने लिखित आश्वासनही दिले होते. मात्र, या आश्वासनानंतरही मागील वर्षी चंद्रपुरात अत्यंत गोपनीय पद्धतीने आर्य वैश्य समाजाचा सर्व्हे करण्यात आला होता. National OBC Federation
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते आणि दोन सदस्यीय टीम चंद्रपुरात येऊन हा सर्व्हे पूर्ण केला होता. त्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याला विरोध दर्शवून निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही आर्य वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी ओबीसी महासंघाने पुन्हा आंदोलन छेडले आहे.
या निदर्शनांमध्ये महासंघाचे सचिव सचिन राजूरकर यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात विरोध करून आम्ही यश मिळवले होते. मात्र, आता प्रशासन गोपनीय पद्धतीने आर्य वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने ओबीसी समाजाचा अंत पाहू नये.” Backward Class Reservation
या आंदोलनाला मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी पाठिंबा दर्शवला. ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असून, इतर कोणत्याही नव्या समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान दिल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.
