Chandrapur house robbery
Chandrapur house robbery : चंद्रपूर बातमी पोलीस कारवाईची – १४ एप्रिल रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात भव्य रॅली काढत महामानवाला आदरांजली दिली. अनेक अनुयायी या दिवशी शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. मात्र या संधीचा फायदा घेत चोरांनी बाबुपेठ येथील एका घरावर डल्ला मारला. विशेष म्हणजे या घरफोडी गुन्ह्यात एका महिलेचा समावेश होता.
चंद्रपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत ४ आरोपीना मोठ्या शिताफीने अटक केली असून या प्रकरणी ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Ambedkar Jayanti theft
डॉक्टरांचा निष्काळजीपणा चंद्रपुरात ११ वर्षीय मुलीचा मृत्यू
पंचशील चौक बाबुपेठ येथील ४५ वर्षीय किरण मधुकर कांबळे हे १४ एप्रिल निमित्त निघालेल्या रॅलीत कुटुंबासह सहभागी झाले होते. रात्री ११ .१५ वाजता घरी कांबळे कुटुंब परतले असता मुख्य दाराला लावलेले कुलूप तोडलेल्या अवस्थेत होते. कांबळे यांनी आत प्रवेश केला असता घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते, लोखंडी आलमारीत ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने व रोख असा एकूण ६७ हजारांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत कांबळे कुटुंबाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. Festival day theft India
गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी तपास सुरु केला, घटनास्थळी जाऊन पोलीस पथकाने पाहणी केली, याबाबत गुप्त माहिती मिळविण्यात आली, माहितीच्या आधारे पोलिसांनी महाकाली कॉलरी आनंदनगर मध्ये राहणाऱ्या व्यंकटेश उर्फ व्यंकय्या महेंद्र कोपेलवार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली, त्याने याबाबत माहिती दिली कि सदर घरफोडी २९ वर्षीय भारती उर्फ मुस्कान व तन्वीर गेब यांच्यासोबत मिळून केली.
या घरफोडी मधील सोने आरोपींने नागपुरातील मोहम्मद फैजान मोहम्मद वकील अन्सारी याला विकले, पोलिसांनी मोहम्मद फैजान ला अटक केली. आरोपींची यापूर्वी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनि चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी, दुचाकी चोरी व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन जबरी चोरी व नागपुरातून दुचाकी वाहन चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. आरोपीकडून सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल असा एकूण ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्चीरे, कोलटें, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राहुल चितोडे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली असून पुढील तपास भावना रामटेके व संतोषकुमार कणकम करीत आहे.