Chandrapur RTO office timing
Chandrapur RTO office timing : चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता जनतेला उष्माघाताचा त्रास होऊ नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या खालील सेवांच्या वेळेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. Chandrapur transport department news
योग्यता प्रमाणपत्र देण्याकरिता बाबूपेठ – बल्लारपूर बायपास रोड येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर होणारी वाहन तपासणी (पासिंग) तसेच कार्यालयात होणारी पक्की अनुज्ञप्ती चाचणी (Driving Test) 23 एप्रिल पासून सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 4 ते 6.30 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. ज्या अर्जदारांनी वाहन 4.0 या वाहनप्रणालीवर यापुर्वी वेळा घेतल्या असल्यास त्यांनी देखील सदर वेळेत उपस्थित राहून कामे करून घ्यावी. इतर कामकाज पुर्वीप्रमाणेच होईल.
तरी सर्व वाहन मालकांनी व चालकांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.