Chandrapur ST bus launch | चंद्रपूरमध्ये एसटी महामंडळाच्या नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा – प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

Chandrapur ST bus launch

Chandrapur ST bus launch : सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा आज श्री माता महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे पार पडला.

बियाणी पेट्रोल पंपावर कारवाई करा, आपची मागणी

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर ते अंचलेश्वर गेट असा प्रवास करत बसमधील सुविधांचा अनुभव घेतला. ST bus launch event

या कार्यक्रमाला एसटी महामंडळच्या जिल्हा विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी व्यवहारे, आगार व्यवस्थापक अंकुश खडीकर, वाहतूक अधीक्षक गोवर्धन, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, बलराम डोडाणी, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी महानगर अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, सुनील महाकाले, अमोल शेंडे, नकुल वासमवार, कुमार झुनमुलवार, कालिदास धामनगे, माजी नगर सेविका कल्पना बबुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

ST bus launch event

नव्या बसेसच्या आगमनामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या बसेस आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉइंट, आरामदायी आसन व्यवस्था आणि आधुनिक सुरक्षा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि सुविधाजनक होईल. latest public transport news

एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे चंद्रपूर शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक वाहतूक मजबूत होणे ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. त्यांनी बसची पाहणी करत उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. तसेच महाकाली मंदिर ते अंचलेश्वर गेट बसस्थानकापर्यंत प्रत्यक्ष प्रवास केला.यावेळी महाकाली मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजा करून बसचे लोकार्पण करण्यात आले. 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!