Rajura illegal liquor raid
Rajura illegal liquor raid : राजुरा, 21 एप्रिल 2025 : राजुरा गुन्हे अन्वेषण शाखेने (DB) अवैध दारूविक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली असून, 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी सलग दोन दिवसांत पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ₹12,13,250/- किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा तसेच वाहने जप्त करण्यात आली आहेत. Rajura police liquor seizure
चंद्रपूर जिल्ह्यात पुढील ३ दिवस हिट व्हेव चा कहर
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री. मूम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली व परि. पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये राजुरा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पो.उपनि. पांडुरंग हाके, पो.उपनि. भिष्मराज सोरते, तसेच पोलीस अंमलदार किशोर तुमराम, विकी निर्वान, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आनंद मोरे आणि अविनाश बांबोडे यांचा समावेश होता. Rajura crime news 2025
पाच रेडमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :
🔸 रेड क्र. 1
- 2 खोके रॉकेट देशी दारू (200 नग, प्रत्येकी 90ml)
- एकूण किंमत : ₹10,000/-
🔸 रेड क्र. 2
- 200 नग खरड्याचे बॉक्समधील देशी दारू – ₹10,000/-
- 25 नग (180ml) रॉयल ट्रॅक विदेशी दारू – ₹6,500/-
- 25 नग (180ml) आयकॉनिक व्हाईट विस्की – ₹7,500/-
- 12 नग (500ml) हंड्रेड थाउजंड बियर कॅन्स – ₹3,600/-
- एकूण किंमत : ₹28,600/-
🔸 रेड क्र. 3
- 14 बॉक्समध्ये 1400 नग देशी दारू (90ml, ₹50/- प्रति नग) – ₹70,000/-
- वाहन – महिंद्रा बोलेरो कँपर (MH 34 AV 1775) – ₹10,00,000/-
- एकूण किंमत : ₹10,70,000/-
🔸 रेड क्र. 4
- 25 नग रॉकेट संत्रा देशी दारू – ₹1,250/-
- वाहन – दुचाकी एक्सेस 125 (MH 34 BJ 3335) – ₹40,000/-
- एकूण किंमत : ₹41,250/-
🔸 रेड क्र. 5
- 144 नग रॉकेट संत्रा देशी दारू (180ml, ₹100/-) – ₹14,400/-
- वाहन – दुचाकी एक्सेस 125 (MH 34 CL 1843) – ₹50,000/-
- एकूण किंमत : ₹64,400/-
एकूण जप्त मुद्देमालाचा तपशील :
दारू व वाहने मिळून एकूण किंमत – ₹12,13,250/-
कडक कारवाईचा इशारा :
राजुरा DB च्या या सखोल कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.