amrut scheme water supply problems । अमृत योजनेचा फटका; पाणी नाही, जनता आहे त्रस्त!, आपने दिला आंदोलनांचा इशारा

amrut scheme water supply problems

amrut scheme water supply problems : चंद्रपूर – बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर प्रभागात पाण्याच्या तीव्र टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, अमृत योजनेअंतर्गत पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाला जोरदार हाक दिली आहे. अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने जनतेचे हाल सुरू असून, मूलभूत सुविधेसाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे.

पडोली मध्ये १ कोटी रुपयांची आधुनिक अभ्यासिका

या गंभीर परिस्थितीबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. “स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्याकडून बाबुपेठ वर वीज पाण्याची सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे, प्रशासकीय अधिकारीही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप राजू कुडे यांनी केला आहे. aam aadmi party water protest

तर तीव्र आंदोलन करणार

राजू कुडे पुढे म्हणाले, “अमृत योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना एक थेंब पाणी मिळत नाही. ही दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे.” त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र विधानसभेत चंद्रपूर महानगरपालिकेतील ९० टक्के अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले होते. परंतु या वक्तव्यानंतरही प्रत्यक्षात आंबेडकर नगरसारख्या भागात नागरिकांना एका थेंब पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, ही बाब खेदजनक आणि खोट्या विकासाच्या दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे.

Powered by myUpchar

स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाण्याविना रोजचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना या टंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून येणाऱ्या महानगरपालिकेचा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.

आतातरी या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, याकडे आता जनतेचे लक्ष्य लागले आहे.

Leave a Comment