Chandrapur crime case solved
Chandrapur crime case solved : चंद्रपूर – कुठं जायचं आहे? चल सोडून देतो. असे म्हणत बस ची वाट बघणाऱ्या प्रवाश्याला जुनोना गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील झुडपात नेत मारहाण करीत त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने दोघांनी लुटले. प्रवाशाने हिम्मत दाखवीत याबाबत रामनगर पोलिसात तक्रार दिली, पोलिसांनी शिताफीने तपास करीत या प्रकरणी दोघांना अटक केली.
मानव वन्यजीव संघर्षावर आमदार मुनगंटीवार यांनी घेतली महत्वाची बैठक
आधी लिफ्ट दिली
२९ मे रोजी चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी निवासी गोपेश गोविंद कुंडू हा गावी जाण्यासाठी बसची वाट बघत होता, यावेळी २ युवकांनी कुठे जायचे आहे? असे गोपेश ला विचारले, चल तुला बल्लारशाह सोडतो आमच्या सोबत चल असे म्हणत गोपेश ला दुचाकी वाहनावर बसवून नेले.
मात्र गोपेश ला त्या २ युवकांनी बल्लारशाह कडे न नेता जुनोना चौक ते जुनोना गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील झाडाझुडपात नेत गोपेश ला मारहाण करीत त्याच्याजवळील सोन्याचे दागिने, रोख व मोबाईल असा माल बळजबरीने काढत दोघांनी पळ काढला. Chandrapur crime news today
गोपेश घाबरला पण?
अचानक घडलेल्या या प्रकाराने गोपेश घाबरला होता, मात्र त्याने हिम्मत करीत दुसऱ्यासोबत असा प्रकार घडता कामा नये व आपल्याजवळील रोख, दागिने व मोबाईल मिळावा यासाठी त्याने तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठत, घडलेल्या प्रकारची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३०९ (६), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी अत्यन्त शिताफीने ३० वर्षीय स्मित राजेश्वर कोटे, ३१ वर्षीय प्रकाश भुरेलाल कबीरदास दोघेही राहणार बल्लारशाह यांना अटक केली.
पोलिसांनी आरोपीकडून फिर्यादी गोपेश चा मोबाईल, रोख रक्कम व दागिने सहित गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लक्ष २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मूमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सपोनि देवाजी नरोटे, सपोनि हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, शरद कुडे, आनंद खरात, लालू यादव, प्रशांत शेंद्रे, पेतरस सिडाम, सचिन गुरुनुले, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.
