Chandrapur Gadchiroli Highway accident । चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात, ४ जखमी; एकाचा मृत्यू

Chandrapur Gadchiroli Highway accident

Chandrapur Gadchiroli Highway accident : सावली (चंद्रपूर): चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज येथील नंदिनी बॉर जवळ आज (१७ मे) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गडचिरोलीवरून सावलीकडे येणाऱ्या एमएच ३३ एसी ३९३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा मागील चाक अचानक फुटल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि समोर असलेल्या सायकलस्वारास जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन दोन वेळा उलटून शेवटी सरळ उभी राहिली. Chandrapur road accident news today

चंद्रपुरात ५ किलोमीटर लांब तिरंगा यात्रा

या अपघातात चारचाकीतील वैभव सोमनाकार (वय २७, नवेगाव) आणि चालक अनिरुद्ध कोवे हे गंभीर जखमी झाले. तसेच सायकलस्वार युवराज रोहनकार (वय ५५) आणि त्यांची पत्नी वनिता रोहनकार (वय ५०) हेही गंभीर जखमी झाले.

Powered by myUpchar

घटनेनंतर तातडीने सर्व जखमींना खाजगी वाहनाद्वारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चालक अनिरुद्ध कोवे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेची नोंद सावली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment