Illegal Cockfighting Gambling Raid
Illegal Cockfighting Gambling Raid : भद्रावती – चंद्रपूर जिल्हा हा वाघाच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे हादरून गेला आहे, असं असले तरी गुन्हेगार वृत्ती आजही झुडपी जंगलात अवैध काम करीत आहे, विशेष म्हणजे वाघाच्या दहशतीला झुगारून अवैध धंदे सरार्सपणे होत आहे.
दारू दुकानाविरोधात जनता रस्त्यावर
२८ मे रोजी पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत मौजा तिरवंजा येथे गावातील शेतालगत असलेल्या झुडपी जंगलात काही इसम कोंबड्याची झुंज लावीत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या झुडपी जंगलात धाड मारली असता त्याठिकाणी ७ आरोपी सहित १ मृत व २ जखमी कोंबडे, दोन कात्या, ७ मोटारसायकल असा एकूण ४ लक्ष ५९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. police raid on illegal gambling
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, अशोक मंजुळकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुधरी, गजानन नागरे, खुशाल कावळे, शैलेश दुर्गेमवार व रोहित चिटगिरे यांनी केली.
कोण आहे आरोपी?
- ६३ वर्षीय महादेव गोपाळा गौरकार, खैरगाव, चंद्रपूर
- ६६ वर्षीय विजय बाबुराव काटकर, तुकूम एसटी वर्कशॉप जवळ चंद्रपूर
- ३८ वर्षीय विनोद मारोती मुनघाटे, सिनाळा, चंद्रपूर
- ४० वर्षीय अनिल किसन सोनटक्के, घुटकाला तलाव, चंद्रपूर
- ३४ वर्षीय हर्षल सुधाकर बैरम, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर
- ४३ वर्षीय सुरेंद्र पांडुरंग निनावे, भानापेठ, चंद्रपूर
- ३५ वर्षीय शेख राजू शेख मुमताज, घुटकाला वार्ड, चंद्रपूर
- २९ वर्षीय सौरभ मनोज वानखेडे, गोकुळ गल्ली, बाजार वॉर्ड, चंद्रपूर
- पाहिजे आरोपी प्रशांत ढवस, तिरवंजा, भद्रावती
