livestock killed by power lines । वादळानंतर शेतात मृत्यूचे तांडव – ८ जनावरांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू!

livestock killed by power lines

livestock killed by power lines : सावली – मानसूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे प्रवाहीत तारे तुटून शेतात पडल्याने 8 जनावरांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज 24 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता सावली तालुक्यातील उसेगाव येथे घडली आहे.

अचानक वादळ आले आणि…

नेहमीप्रमाणे आजही उसेगाव येथील जनावरे शेतात चरत होते. त्यामध्ये 6 बैल आणि 2 गाईंचा समावेश होता. शेतात चरत असताना अचानक आलेल्या वादळामुळे विजेचा खांब कोसळला आणि त्यावरून तारे तुटून खाली पडल्या. या तारांना स्पर्श झाल्याने जनावरारे विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. ही घटना उद्धव रोहणकर यांच्या शेतात घडली.

राजुरा विधानसभा क्षेत्रात राजकीय भूकंप

घटनेची माहिती मिळताच गावकरी शेतात दाखल झाले. महावितरण कंपनीला याची माहिती देण्यात आली. कंपनीने त्वरित सूचना दिली की कोणत्याही जनावरांना हात लावू नका, कारण तारा अजूनही प्रवाहित होत्या. काही वेळातच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ विजेचा प्रवाह खंडित केला.

या अपघातात कालीदास पाल, देवाजी भोयर, मानिक गोहणे, बालूजी ठुसे, भोजराज गोहणे आणि अरुण भोयर यांचे प्रत्येकी एक बैल तसेच संतोष भोयर आणि हिराजी गोहणे यांची प्रत्येकी एक गाय असा एकूण 8 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

या गंभीर घटनेनंतर पशुपालकांनी महावितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी तसेच सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. Mahavitaran responsibility in livestock deaths

Leave a Comment