man eater tiger captured । नागभीड तालुक्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद, २ नागरिकांची केली होती शिकार

man eater tiger captured

man eater tiger captured : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात वाघाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून आतापर्यन्त तब्बल २२ नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. मे महिन्यात ९ नागरिकांना वाघाने ठार केले असून यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. forest conflict

नागभीड तालुक्यात २ नागरिकांची शिकार करणारा TATR 224 या नर वाघाला २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गंगासागर हेठी बिट, सावर्ला रिट, शासकीय जमीन सर्वे क्र.२ तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्र येथे वनविभागाने डार्ट मारीत जेरबंद केले.

भाजप आमदाराने पकडली अवैध दारू

२ नागरिकांचा घेतला होता बळी

नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात १५ एप्रिल रोजी गंगासागर हेठी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ४५) व १८ मे रोजी वाढोणा येथील मारोती नकटू शेंडे (वय ६४)या दोघांवर आलेवाही बीट परिसरात हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता  . या घटनेनंतर वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेत वाघाला पकडण्यासाठी मोहीम राबवली. आज वनविभागाच्या मोहिमेला यश मिळाले सदर नरभक्षक नर वाघ हा अंदाजे ८ वर्षाचा आहे.

forest conflict

सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी या मोहिमेत उपवन संरक्षक राकेश हेपट, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, डॉ, रविकांत खोब्रागडे, पोलीस दलातील शुटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार,अरविंद माने, राजेंद्र भरणे, घनश्याम लोनबले यांनी अथक परिश्रम केले.

Leave a Comment