minor girl rescued from sex trafficking । चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई

minor girl rescued from sex trafficking

minor girl rescued from sex trafficking : १७ वर्षाच्या मुलीला देह व्यापारात ढकलणाऱ्या महिलेला चंद्रपूर शहर पोलिसांनी १३ मे रोजी गौतम नगर परिसरातून अटक केली. आरोपी महिलेवर महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. sex trafficking case Chandrapur 2025

महावितरणचे चंद्रपुरातील बाबुपेठ मध्ये ब्लॅकआउट

शहरात अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे शार पोलिसांनी शोधमोहीम राबवित गौतमनगर, महाकाली वार्ड येथे अमीना नावाच्या महिलेची खोली शोधली असता त्याठिकाणी १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळली.

पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले कि अमीना नावाच्या महिलेच्या सांगण्यावरून देहव्यापार करते, पोलिसांनी तात्काळ अमीना सैय्यद या महिलेवर गुन्हा दाखल करीत अटक केली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय घोटे, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

Leave a Comment