murder after argument at paan shop | चंद्रपूर जिल्हा हादरला, पान ठेल्यावर झालेल्या वादात युवकाची हत्या

murder after argument at paan shop

murder after argument at paan shop : पानठेल्यावर झालेल्या किरकोळ वादाच्या पार्श्वभूमीवर एका अल्पवयीनासह चार जणांनी मिळून एका युवकाची चाकूने भोसकून निर्दयी हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता जिल्ह्यातील सावली तालुक्यातील केरोडा हेटी गावात घडली. मृत युवकाचे नाव समीर खंडाले आहे.

चंद्रपुरात अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलले, महिलेला अटक

पानठेल्यावर वाद

सावलीपासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या केरोडा हेटी येथील समीर हरिदास खंडाले (३०) मंगळवारी रात्री गावातील पानठेल्यावर गेला होता. तिथे गिरीधर वालदे आणि त्याचा मुलगा अभय गिरीधर वालदे यांच्याशी काही कारणावरून वाद झाला. वाद वाढताना पाहून अभय वालदे आपल्या दुचाकीवरून तेथून निघून गेला. काही वेळाने समीरचा मोठा भाऊ प्रवीण हरिदास खंडाले (४२) याला अमित शेट्‌टे याने फोन करून माहिती दिली की, आंबेडकर चौकात समीरचा मृतदेह पडलेला आहे, त्याची चाकूने हत्या करण्यात आली आहे. paan shop fight ends in murder

प्रवीण घटनास्थळी पोहोचला असता त्याला समीरचा मृतदेह सापडला. त्याचे शर्ट आणि पँट पूर्णतः रक्ताने माखलेले होते. शर्टवर चाकूचे वार स्पष्टपणे दिसत होते. प्रवीणने चौकशी केली असता समजले की वादानंतर अभय वालदे दुचाकीवरून व्याहाड येथे गेला आणि तेथून पियुष लाटेलवार व एका अल्पवयीनाला घेऊन आला. त्या वेळी गिरीधर वालदे आधीपासूनच घटनास्थळी उपस्थित होता. चौघांनी मिळून समीरसोबत पुन्हा वाद घालून त्याच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केली. समीरचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच चौघेही तेथून पळून गेले. latest crime news chandrapur district

मृत समीरच्या भावाच्या फिर्यादीवरून सावली पोलिसांनी अभय गिरीधर वालदे, गिरीधर पतरुजी वालदे, पियुष सुरेश लाटेलवार आणि एका अल्पवयीनाविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम १०३ (१), ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवून चौघांनाही अटक केली आहे. पुढील तपास सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप पुल्लावार करत आहेत.

Leave a Comment