ndps act chandrapur arrest । चंद्रपुरात ओसाड कॉलेजचं मैदान की ड्रग्सचा अड्डा? शहर पोलिसांची कारवाई!

ndps act chandrapur arrest

ndps act chandrapur arrest : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागामध्ये ओसाड पडलेले डीएड कॉलेजच्या मैदानात अंमली पदार्थाची विक्री काळोखात सुरु आहे, यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई सत्र राबवित २४ वर्षीय युवकाला एमडी ड्रग्स पावडर सहित अटक करीत तब्बल १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 24 year old arrested with md drugs

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही

चंद्रपूर जिल्हा दारूबंदी व दारूबंदी उठल्यानंतर च्या काळात जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते मात्र आजही अंमली पदार्थाची तस्करी पोलीस प्रशासन थांबवू शकलेले नाही.

तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शहर व जिल्ह्यातील ओसाड पडलेल्या ठिकाणावर सर्च मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होती, त्यावेळी पोलिसांनी अनेक अवैध धंदे उघडकीस आणले. मात्र पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यावर हि कारवाई थंडबस्त्यात गेली, त्यामुळे ओसाड पडलेल्या ठिकाणी पुन्हा अवैध धंद्याची वर्णी लागली.

गुन्हेगारीचा अड्डा

चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून बाबुपेठ च नाव आहे, या प्रभागात शासकीय अध्यापक विद्यालयाचे मैदान आहे, कालांतराने शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलणे शासकीय अध्यापक विद्यालयात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने प्राध्यापक आपली वसाहत सोडून गेले, आणि हीच वसाहत पुढे चालून गुन्हेगारीचा अड्डा बनली.

१५ मे रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना या एमडी ड्रग्स विक्री बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली असता त्याठिकाणी संशयास्पद तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळ एमडी पावडर आढळले.

२४ वर्षीय तरुणाला झटपट पैसे कमविण्याचा चस्का

आरोपी २४ वर्षीय महेश सुबोध बाला राहणार जुनोना चौक, बाबुपेठ याच्याजवळून ९.०४० ग्राम एमडी पावडर किंमत ४५ हजार व दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीई ७१९५ असा एकूण १ लक्ष १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बाला वर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. md drugs in chandrapur

Powered by myUpchar

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय धोटे, कापूरचंद खरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे करीत आहे.

Leave a Comment