PMGSY bridge projects 2025 । पूल झाला मंजूर, वाट बदलणार गावाची! PMGSY प्रकल्प 2025 ला गती

PMGSY bridge projects 2025

PMGSY bridge projects 2025 : चंद्रपूर : करंजी आणि खराळपेठ या दोन महत्वाच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे साकार होणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – III अंतर्गत १८१.४७ लक्ष रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या ३२.३०० मीटर लांबीच्या या पुलाचे भूमिपूजन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते झाले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष देविदास सातपुते, तालुका काँग्रेस माजी अध्यक्ष तुकाराम झाडे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सोनी दिवसे, देविदास भट्टे, विपीन पेद्दीलवार , सीन्नू कन्नमनूरीवार, गौतम झाडे, राजू झाडे, गेडेकर ताई, विनोद नागपुरे, बालाजी चंनकापुरे, साईनाथ कोडापे, विनोद जगताप यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Chandrapur development news

chandrapur development news

गैरसोय आता दूर होणार

या भागातील नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी आज पूर्णत्वास आली आहे. करंजी आणि खराळपेठ या दोन महत्त्वाच्या गावांमधील वाहतूक या पुलामुळे अधिक सुलभ होणार असून, पावसाळ्यामध्ये होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.

Powered by myUpchar

या प्रकल्पाबद्दल बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आज या पुलाचे भूमिपूजन होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. करंजी आणि खराळपेठ परिसरातील नागरिकांना या पुलामुळे मोठी सोय होणार आहे. पावसाळ्यात अनेकदा या मार्गावरील वाहतूक थांबते, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हा पूल पूर्ण झाल्यावर त्यांची ही समस्या कायमची दूर होईल.” Bridge Construction Karanji-Kharalpeth Chandrapur

या भूमिपूजन सोहळ्याला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!