tendu leaves season danger । 8 दिवसांत 8 मृत्यू… चंद्रपूरच्या जंगलात तेंदूपत्ता म्हणजे मृत्यूची टांगती तलवार!

tendu leaves season danger

tendu leaves season danger : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याची घटना घडली असून आतापर्यंत मानव वन्यजीव संघर्षात २१ नागरिकांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक जंगलाकडे कूच करू लागले मात्र वाघाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे. मे महिन्यात ८ नागरिकांची वाघाने शिकार केल्याने ग्रामीण भागात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. tiger attack in chandrapur today

देशी कट्टा व जिवंत काडतूस सहित २४ वर्षीय युवकाला अटक

१८ मे रोजी जिल्ह्यातील नागभीड व मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत नागभीड तालुक्यातील ६३ वर्षीय मारुती नक्तू शेंडे हे पत्नीसोबत तळोधी रेंजमधील आलेवाही बीटमधील वनक्षेत्रात कंम्पार्टमेन्ट क्रमांक ६५७ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मारुतीवर हल्ला चढविला अचानक झालेल्या या हल्ल्यात मारुती यांच्या पत्नीने गाव गाठत नागरिकांना माहिती दिली, नागरिक घटनास्थळी दाखल झाले असता मारुतीच्या डोक्यावर वाघाने गंभीर घाव केले होते. गावकर्यांनी तात्काळ मारुतीला सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान मारुतीचा मृत्यू झाला. tiger attack in chandrapur today

Powered by myUpchar

दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील ७० वर्षीय ऋषी झुंगाजी पेंदोर हे जंगलात बकऱ्यासाठी चारा आणायला शनिवारी १७ मे रोजी जंगलात गेले होते, रात्र झाल्यावर ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली, १८ मे रोजी वनविभागाने जंगलात पेंदोर यांचा शोध घेतला असता वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक १००८ मध्ये ऋषी पेंदोर यांच्या शरीराचे अवयव आढळून आले, संपूर्ण शरीर वाघाने खाल्ल्याने डोक्याचा भाग व हात शिल्लक होता. ऋषी हा मानसिक रोगी असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी १२ मे रोजी भांदुर्णी मध्ये भूमिका दीपक भेंडारे या महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले होते. tiger conflict in rural india

५ दिवसात ६ महिलांचा मृत्यू

१० मे रोजी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय कांताजी बुधाजी चौधरी, ३० वर्षीय शुभांगी मनोज चौधरी व ५० वर्षीय रेखा शालिक शेंडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. ११ मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावात ६५ वर्षीय विमल बुधाजी शेंडे, १२ मे रोजी मूल तालुक्यातील भांदुर्णी गावातील भूमेश्वरी दीपक भेंडारे, १४ मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात ५४ वर्षीय कचराबाई अरुण भरडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सदर सर्व महिला तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. villager killed by tiger in forest

वाघ तुमच्यामुळे वाढले तर बंदोबस्त करा – आमदार विजय वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यात ८ दिवसात ८ नागरिकांना वाघाने हल्ला करीत ठार केले, मात्र वनविभाग यावर अजूनही उपाययोजना करताना दिसत नाही, जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना त्यांनी वारंवार वाघांची संख्या वाढल्याने आमच्यामुळे वाघ वाढले असा गवगवा केला मात्र आज वाघामुळे नागरिक दहशतीमध्ये आहे तर त्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, वाघांना अधिवास कमी पडत आहे, ताडोबा बफर व कोर झोन मध्ये वाघांची संख्या वाढल्याने उर्वरित वाघांचा वनविभागाने बंदोबस्त करायला हवा. जर वनविभागाने वाघांचा बंदोबस्त केला नाहीतर आता वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचे मृतदेह वनविभागाच्या कार्यालयापुढे ठेवणार, जोपर्यंत वाघांचा बंदोबस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह उचलणार नाही हा आमचा वनविभागाला इशारा आहे. tiger attack in chandrapur today

वनविभागाने केले आवाहन

जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. या कार्यातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो.

जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

दूपत्ता हंगाम – 2025 दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये ८ व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना खालील सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. tiger attack in chandrapur today

  • 1. वाघाच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.
  • 2. संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.
  • 3. सकाळी 8 वाजता पूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी 5 वाजता पूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.
  • 4. एकट्याने जंगलात जाऊ नये. समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे.
  • 5. प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.
  • 6. संकलन दरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात घालावा.
  • 7. वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी.

वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे..

Leave a Comment