Tullu pump seizure
Tullu pump seizure : चंद्रपूर – शहरातील बालाजी वार्ड,बालाजी मंदिर,मातोश्री शाळेमागील परिसर,महाकाली मंदिर परिसरात महानगरपालिकेमार्फत टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात येऊन 30 ग्राहकांचे टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.
चंद्रपुरातील जेबी आर्ट्स अँड स्टेशनरी मध्ये भीषण आग
मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.
Powered by myUpchar
पाण्याचा जितका वापर तितकेच बिल
सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो. municipal action against water theft
तर काळ्या यादीत टाकणार
त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.