woman killed by tiger in Maharashtra । 😨 चंद्रपूर हादरलं! 🛑 वाघाच्या हल्ल्याचा थरार LIVE – जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडली महिला

woman killed by tiger in Maharashtra

woman killed by tiger in Maharashtra : चंद्रपूर : 14 मे 2025 – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले दरदिवशी वाढत असून आज बुधवारी (१४ मे) सलग चवथ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र ८६२ मध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची थरारक घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. कचराबाई अरुण भरडे (५४) रा . करबडा असे मृतक महिलेचे नाव आहे. चार दिवसातील आजचा सहावा बळी आहे. tiger attack during tendu leaf collection

वाघाचे हल्ले रोखण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी घेतली तातडीची बैठक

महिलेला फरफटत नेत होता वाघ


चिमूर तालुक्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील कुटुंबीय आपला संसार चालविण्यासाठी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. आज बुधवारी कचराबाई अरुण भरडे ही महिला आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला. तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याचा आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली. पतीने बघितले तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता. tiger kills woman in forest area

नागरिकांचा आक्रमक पवित्रा


या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा,गावाभोवताल तारचे कुंपण करा,मुलाला नौकरी द्या,असा मागण्या मान्य करा तरच मृतदेह उचला, असा आक्रमक पवित्रा मृतक महिलेचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता. वनविभाग व पोलीस विभागाने आक्रमक झालेल्या नागरिकांची समजूत काढली. त्या नंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.या वेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम,वनपाल विनोद किलनाके,अमोल कवासे,जरारे वनरक्षक, मेश्राम, नागलोत, जिवतोडे, गेडाम, खारडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे,सहकायक पोलीस निरीक्षक, दीप्ती मडकाम,पोलीस कर्मचारी वनकर्मचारी वनमजूर आदी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने मयत भरडे कुटुंबास पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली. villagers protest after tiger attack

तेंदूपत्ता गोळा करण्याची स्पर्धा

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही तब्बल 300 च्या जवळपास आहे, सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता चा हंगाम सुरू झाला असून ग्रामीण भागातील नागरिक भल्या पहाटे जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जातात. चांगला तेंदूपत्ताच्या मोहापायी नागरिक वाघाच्या क्षेत्रात जातात त्यामुळे हे हल्ले सध्या वाढत आहे.


वनविभागाच्या प्रत्येक विभागात हजारोंच्या संख्येत पहाटे नागरिक तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जात असल्याने वनविभाग त्यांना थांबवू शकत नाही आहे. मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी द्वारे एक बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. मात्र त्या बैठकीत नेमकं काय घडलं? याबाबत काही माहिती पुढे आलेली नाही.

Leave a Comment