BJP mandal president appointments । चंद्रपूर भाजपात फेरबदल, ६ नव्या मंडळ अध्यक्षांच्या नावाची घोषणा

BJP mandal president appointments

BJP mandal president appointments : चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातील विविध मंडळ अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे आयोजित विशेष बैठकीत या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात आला.


प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश महामंत्री माधवी नाईक, आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी मंडळ अध्यक्ष पदाकरिता दिलेल्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांचा अनुभव, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य या निकषांवर विचार करून या नावांना प्रदेश नेतृत्वाकडून मान्यता देण्यात आली. Chandrapur BJP organizational updates

हे आहे नवे मंडळ अध्यक्ष


या नियुक्त्यांमध्ये तुकूम मंडळासाठी स्वप्नील डुकरे, बाजार वार्ड मंडळासाठी सुभाष अदमाने, सिव्हिल लाईन्स मंडळासाठी रवि जोगी, बाबुपेठ मंडळासाठी प्रदीप किरमे, बंगाली कॅम्प मंडळासाठी अॅड. सौ. सारिका संदूरकर तसेच चंद्रपूर ग्रामीणसाठी विनोद खेवळे यांची निवड करण्यात आली आहे.

वन्यप्राण्यासाठी कर्दनकाळ


सदर सर्व नावे अगोदर विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या निदर्शनास आणून देत प्रदेशाकडे पाठविण्यात आली होती. आधी चंद्रपूर शहरात पाच मंडळ अध्यक्ष होते. मात्र आता ग्रामीण भागाचा सहावा मंडळ अध्यक्ष महानगर संघटनेत जोडण्यात आला आहे. त्यामुळे आता महानगर अध्यक्षांच्या अधिपत्याखाली सहा मंडळ अध्यक्ष असणार आहेत.


या नवीन नियुक्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीच्या महानगर संघटनेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळात भाजपाचा विचार पोहोचवणे, पक्षाचे ध्येयकार्य जनतेपर्यंत नेणे आणि संघटना मजबूत करणे हे या नव्या अध्यक्षांचे महत्त्वाचे काम असेल.


महानगरातील भाजप संघटना अधिक सक्षम करण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान, जबाबदारी वाटप आणि संघटन विस्तार हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ही नियुक्ती म्हणजे संघटनात्मक बांधणीची एक महत्त्वाची पायरी आहे. सर्व महामंडळ अध्यक्षांनी आपल्या कार्यक्षेत्रात संघटना वाढवावी, जनतेच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी पक्षातर्फे प्रयत्न करावेत आणि भाजपाचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Leave a Comment