criminal caught with stolen vehicle । गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग पण दुचाकी चोरीत चंद्रपुरात अडकला

criminal caught with stolen vehicle

criminal caught with stolen vehicle : चंद्रपूर – जिल्ह्यात वाहनांच्या चोरी प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्यांचा छडा लावावा असे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम राबवित खबरीद्वारे गोपनीय माहिती मिळवली असता रेकॉर्डवरील आरोपी एसटी वर्कशॉप जवळ दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी येत असल्याचे कळताच पथकाने सापळा रचत एकाला अटक केली. vehicle theft cases solved by police

तुकूम अपघात प्रकरणी युवती सेनेने केली लक्षवेधी मागणी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी ४५ वर्षीय जनरलसिंग उर्फ मन्नूसिंग टाक राहणार समतानगर नेरी चौक ऊर्जानगर याला अटक केली. जनरलसिंग ने महिनाभरापूर्वी नायडू हॉस्पिटल तुकूम जवळून स्प्लेंडर प्रो क्रमांक MH ३४ AX ३८४८ छोटी केली होती.

गडचिरोली मध्ये चैन स्नॅचिंग

आरोपीने जनरलसिंग ने गडचिरोली मध्ये महिलेकडून सोन्याची चैन हिसकावत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत गडचिरोली पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकीसहित ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, नितीन साळवे, नितीन कुरेकार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, गोपाल आतकुलवार, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व प्रसाद धुळगंडे यांनी केली.

Leave a Comment