government ITI job mela Chandrapur 2025 । 🔧 चंद्रपुरात आयटीआय जॉब मेळावा; संधी दारात!

government ITI job mela Chandrapur 2025

government ITI job mela Chandrapur 2025 : चंद्रपूर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चंद्रपूर येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय ” शिकाऊ उमेदवार मेळावा तसेच रोजगार मेळावा”आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे.

रेल्वे भूखंड संपादनात गोंधळ, हंसराज अहिर यांनी सांभाळली बाजू

उपस्थित राहा

शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी योगेश धवणे (9405912096) लोखंडे मॅडम (9423690138) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. वानखेडे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले.

Sharing Is Caring:

1 thought on “government ITI job mela Chandrapur 2025 । 🔧 चंद्रपुरात आयटीआय जॉब मेळावा; संधी दारात!”

Leave a Comment