hit and run case at toll plaza । टोल वाचवण्याच्या नादात कर्मचाऱ्याला चिरडलं; विसापूर टोल नाक्यावर वाहनचालकाचा थरार

hit and run case at toll plaza

hit and run case at toll plaza : बल्लारपूर (चंद्रपूर) – बल्लारपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या विसापूर टोलनाक्याजवळ ८ जूनच्या मध्यरात्री १ वाजता एका वाहनचालकाने टोल चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र ऐनवेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ते वाहन त्या कर्मचाऱ्याला चिरडत पुढे गेले. या घटनेत कर्मचारी जखमी झाला असून त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भद्रावतीमध्ये १७ गोवंशाची पोलिसांनी केली सुटका

सीसीटीव्ही मध्ये थरार कैद

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर टोल नाक्यावर मध्यरात्री १ वाजता चारचाकी टाटा एस वाहनाने टोल चुकविण्याचा प्रयत्न केला, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला, यावेळी कम्प्युटर ऑपरेटर २७ वर्षीय संजय अरुण वांढरे याने वाहनासमोर जात त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन चालकाने संजय च्या अंगावर वाहन नेत त्याला चिरडत पुढे गेला. हि सर्व घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेत संजय वांढरे जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्या वाहनचालकांचा पोलिसांनी शोध घेणे सुरु केले.

Leave a Comment