no FIR filed despite evidence । ठोस पुरावे असूनही FIR नाही; आप ने दिला खळखळ्खट्याक आंदोलनाचा इशारा

no FIR filed despite evidence

no FIR filed despite evidence : चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा (chandrapur mahanagarpalika corruption)अजून एक काळा अध्याय समोर आला आहे. कोहिनूर ग्राउंड येथील नागरिकांच्या फिरण्यासाठी तयार केलेल्या ट्रॅकवरील शासकीय पेव्हर्स अर्बन एनव्हायरॉन कंपनीने चोरून स्वतःच्या खासगी कार्यालयात लावले आहेत. यासंदर्भात दि. १६ मे रोजी पालिका आयुक्तांना तक्रार व ठोस पुरावे (फोटो, व्हिडीओ) सादर करूनही अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही.

माजी सैनिकाने दिला आमरण उपोषणाचा इशारा

गाडीत टाकून नेले ती चोरी नाही

याप्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. चंदन पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी अत्यंत उद्धटपणे व निष्काळजीपणे उत्तर दिले की, “पेव्हर्स गाडीत टाकून नेले, त्याला चोरी म्हणता येत नाही.” हे उत्तर म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि यामधून पालिका प्रशासनाचा भ्रष्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

महानगरपालिकेतील संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली असून, हे अधिकारी स्वतःला कोणीही वाकडं करू शकत नाही अशा भ्रमात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे. मात्र अधिकारी वर्गाची मानसिकता इतकी बधीर झाली आहे की, सामान्य जनतेच्या हक्कांची खुलेआम पायमल्ली केली जात आहे.

शासकीय संपत्तीवर डल्ला

ही घटना केवळ पेव्हर्स चोरीची (Pavers theft) नसून, ती सामान्य जनतेच्या हक्कांवर आणि शासकीय संपत्तीवर डल्ला मारण्याची लक्षणीय घटना आहे. जर सामान्य नागरिक काही चूक करतो, तर प्रशासन त्याच्यावर कठोर कारवाई करते. पण एवढा मोठा प्रकार उघडपणे घडूनही महानगरपालिका शांत का आहे? यामागे गुप्त सांठगांठ व भ्रष्टाचाराचा गंभीर वास येतो.

आज दिनांक ६ जून २०२५ रोजी आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi party) वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना या गंभीर घटनेबाबत सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात आला.
या वेळी उपस्थित होते:
👉 मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष),
👉 राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष),
👉 योगेश गोखरे (शहर अध्यक्ष),
👉 प्रशांत सिदुरकर (जिल्हा सचिव),
👉 संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री),
👉 एड. तबस्सुम शेख (शहर महिला अध्यक्ष),
👉 हांडेकर गुरुजी (शहर पदाधिकारी),
👉 विशाल बिरमवार (शहर पदाधिकारी)
आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते.

या घटनेबाबत जर पुढील ८ दिवसांत कोणतीही शासकीय कार्यवाही झाली नाही, तर आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा तर्फे अभिनव आणि बहिरे असल्याचे सॉन्ग करणाऱ्या भ्रष्ट अधिकार्‍यांचा विरोधात तीव्र व ‘खडकट्याक आंदोलन’ करण्यात येईल, असा जबरदस्त इशारा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिला आहे.

हा लढा केवळ भ्रष्टाचाराविरोधात नाही, तर सामान्य जनतेच्या न्यायासाठी आहे. आम आदमी पक्ष शेवटच्या श्वासापर्यंत या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Leave a Comment